Chitra Wagh | खेळात राजकारणी चेंडूफेक करू नका, नाही तर तुमचा कपाळमोक्ष व्हायचा; चित्रा वाघांचं राऊतांना प्रत्युत्तर

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये भारतीय संघ पराभूत झाला आहे. या अंतिम सामन्याला नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह आणि अनेक बडे लोकं उपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. भारतीय जनता पक्ष वर्ल्ड कप जिंकण्याच्या थाटात होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खेळात राजकारणी चेंडूफेक करू नका, नाही तर तुमचा कपाळमोक्ष व्हायचा, असं म्हणत चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

Either team wins the game – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ ( Chitra Wagh ) म्हणाल्या, “सर्वज्ञानी संजय राऊत राजकारणाच्या पिचवर तुमची कामगिरी भाकड ठरली म्हणून क्रिकेटमधल्या पराभवाचं भांडवल करू नका.

त्याचं खापर भाजपवर फोडण्याचं तुमचं लॅाजिक तर तुमच्या लौकिकाला साजेसंच आहे. खेळात कुठला तरी संघ जिंकतो; प्रतिस्पर्धी हरतो.”

“भारतीय संघ जिंकल्याचा आनंद जसा जोशात साजरा केला असता तसंच हरल्याच्या दु:खात आम्ही आपल्या खेळाडूंसोबत आहोत. तुम्ही उगाचच चोरांचे चीअरलीडर बनून स्वत:ची शोभा करून घेऊ नका.

खेळात राजकारणी चेंडूफेक करू नका,नाही तर तुमचाच कपाळमोक्ष व्हायचा”, असही त्यांनी ( Chitra Wagh ) म्हटलं आहे.

दरम्यान, वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. “भारतीय संघावर मी वैयक्तिक टीका करणार नाही. परंतु, भारतीय जनता पक्ष विश्वचषक स्पर्धा जिंकण्याच्या थाटात होता.

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला असता, तर आनंद झाला असता. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून या सामन्यासाठी जे राजकारण आणि जी व्यवस्था करण्यात आली होती, त्यावर दुर्दैवाने पाणी फिरलं आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.