Share

Manoj Jarange | 24 तारखेपर्यंत सरकार मराठ्यांना आरक्षण देणार – मनोज जरांगे

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी  मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये मोठा लढा उभारला आहे.  याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) राज्यभर सभा घेताना दिसत आहे. 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मुंबईमध्ये आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे … Read more

Published On: 

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी  मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये मोठा लढा उभारला आहे.  याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) राज्यभर सभा घेताना दिसत आहे.

24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मुंबईमध्ये आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य सरकारला गेल्या काही दिवसांपूर्वी दिला होता. या मुद्द्यावर जरांगे यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

Let us see our Mumbai – Manoj Jarange

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “आतापर्यंत आम्ही काहीच खोटं वागलेलो नाही. आम्हाला जर मुंबईमध्ये आंदोलन करायचं असेल तर ते आम्ही जाहीर करू आणि मग मुंबईला जाऊ.

मात्र, अद्याप याबाबत आमचं काही ठरलेलं नाही. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत जाण्याची आमच्यावर वेळ येणार नाही.

मुंबईत जाणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. आम्हाला मुंबई बघू द्यायची नाही का? आम्हाला मुंबई बघायची आहे. आम्हाला समुद्रातलं पाणी बघायचं आहे. आमच्यासाठी मुंबई नाही का?

सगळ्या जगाने मुंबई बघितली आहे. आम्हाला देखील मुंबई बघायची आहे. आमचा महाराष्ट्र आमची मुंबई आहे. त्यामुळे आम्ही मुंबई बघणार.

तुम्हाला आम्हाला मुंबई बघू द्यायची नसेल तर आम्हाला तुम्ही महाराष्ट्रात राहू नका, असं सांगा. त्यानंतर आम्ही आसामला चहाचे मळे टाकायला जातो. आमची मुंबई आम्हाला बघू द्या.”

दरम्यान, मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी जालना जिल्ह्यात सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर राज्य शासनाला या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

राज्य सरकार 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी व्यक्त केला आहे.

अशात मराठ्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावरून ओबीसी नेते देखील रस्त्यावर उतरले आहे. अशात मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही