Share

Nana Patole | चंद्रशेखर बावनकुळेंच्या कॅसीनो फोटोची सीबीआय चौकशी व्हायला हवी – नाना पटोले

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) सहकुटुंब मकाऊला गेलेले आहेत. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस … Read more

Published On: 

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) सहकुटुंब मकाऊला गेलेले आहेत. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊचा एक फोटो ट्विट केला आहे.

या फोटोच्या माध्यमातून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले ( Nana Patole ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या कॅसीनो फोटोची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असं नाना पटोले ( Nana Patole ) यांनी म्हटलं आहे.

This photo should be checked – Nana Patole

नाना पटोले ( Nana Patole ) म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशात संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा फोटो ट्विट केला आहे.

या फोटोची तपासणी झाली पाहिजे. वेळ आली तर यामध्ये सीबीआय चौकशी व्हायला हवी. भाजप प्रदेशाध्यक्ष मकाऊला जाऊन कॅसिनो खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर बाब आहे.”

दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  ( Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांची विकृत मानसिकता दिसून येत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले आहे. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहे, त्या ठिकाणी जेवणाच्या बाजूला कॅसिनो आहे.

जाणीवपूर्वक संजय राऊत यांनी अर्धा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी जर संपूर्ण फोटो ट्विट केला असता तर चंद्रशेखर बावनकुळे त्यामध्ये सहकुटुंब दिसले असते. ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवायला हवी”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही