Bacchu Kadu | मनोज जरांगेंनी राज्य शासनाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला की 2 जानेवारीपर्यंत? बच्चू कडू म्हणतात…

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली होती.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने मनोज जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

मात्र, जरांगे यांनी शासनाला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. यानंतर सरकारकडून 2 जानेवारी तर मनोज जरांगे यांच्याकडून 24 डिसेंबर तारीख जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange has given a deadline till December 24 – Bacchu Kadu 

बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, “मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मुदत दिली आहे. याबद्दल माझी ( Bacchu Kadu ) मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी मी ( Bacchu Kadu ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा लागेल. 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने काय प्रगती केली? याबाबत मनोज जरांगे यांना सांगायचं आहे.”

दरम्यान, मराठा समाजाच्या मागणीवरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. यावेळी बोलत असताना बच्चू कडू यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न मांडले आहे आणि ते मांडायला देखील हवे. मात्र, हे करत असताना कोणीही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही सध्या सत्तेत आहात, त्यामुळे तुम्ही ओबीसींसाठी काय केलं? हा सवाल उपस्थित राहणारच.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.