Bachhu Kadu Accident । मंत्रिमंडळ विस्तारा आधीच बच्चू कडूंचा अपघात; सोशल मीडियावर घातपाताची चर्चा

Bachhu Kadu Accident | अमरावती : आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या अपघाताच्या घटना ताज्या असतानाच आता आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये बच्चू कडू (Bachchu Kadu) अपघात झाला आहे. अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रस्ता ओलांडत असताना दुचाकीने त्यांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे.

अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच सुरु झालेलं हे अपघातांचं सत्र अनेक शंका उपस्थित करत आहे. बच्चू कडू यांच्या या अपघातानंतर सोशल मिडीयावर हा घातपात असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. एका महिन्यामध्ये राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे.

डिसेंबर महिन्यात भाजप आमदार जयकुमार मोरे यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. मात्र सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत त्यांना झाली नव्हती.

आता या अपघातांच्या मालिकेमध्ये बच्चू कडू यांचे नाव जोडले गेले आहे. अशातच रामदास कदम यांनी योगेश एकदम यांच्या अपघाताबाबत मोठा गौप्यस्फोट केल्याने या चर्चा अधिकच तीव्र झाल्या आहेत. योगेश कदम यांचा अपघात घडवून त्यांना गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता, असा गौप्यस्फोट रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला. अपघातानंतर योगेश कदमांची गाडी सुदैवाने पोलिसांच्या गाडीला धडकली. यामुळे हा कट फसला, अशा आशयाचं विधान कदम यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.