Share

Chhagan Bhujbal | मी इतर लोकांप्रमाणे गाव बंदी वगैरे काही केलेली नाही; भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना डिवचलं

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आमने-सामने आले आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दोघेही राज्यामध्ये सभा घेताना दिसत … Read more

Published On: 

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आमने-सामने आले आहे.

ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दोघेही राज्यामध्ये सभा घेताना दिसत आहे. अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

मी इतर लोकांप्रमाणे गाव बंदी वगैरे काही केलेली नाही, असं म्हणतं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी जरांगे यांना धारेवर धरलं.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “भारतामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे कुणालाही कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे.

त्यांच्या सभेसाठी माझ्या शुभेच्छा! इतर कार्यकर्त्यांप्रमाणे मी गावबंदी वगैरे काही केलेलं नाही. प्रत्येकाने आपापली मत मांडावी. लोकांना ज्यांचं मत पटेल, लोक त्या बाजूने जातील.”

No one can give script to Chhagan Bhujbal – Chhagan Bhujbal

दरम्यान, छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) भाजपची स्क्रिप्ट वाचतात, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं होतं. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“छगन भुजबळ यांना कोणीच स्क्रिप्ट देऊ शकत नाही, हे सर्वांना माहीत आहे. शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मला कोणीच स्क्रिप्ट देऊ शकत नाही.

35 वर्षापासून मी जे ओबीसी समाजासाठी काम करत आहे, ती माझी स्वतःची स्क्रिप्ट आहे. त्याचबरोबर ते फुले, शाहू, आंबेडकरांचं स्क्रिप्ट आहे”, असं भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही