Share

Chhagan Bhujbal | मी एकटा पडलो नाही, संपूर्ण ओबीसी समाज माझ्या पाठीशी; भुजबळांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केलेल्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. ओबीसी समाजाच्या … Read more

Published On: 

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केलेल्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.

ओबीसी समाजाच्या न्यायासाठी आम्ही लढणार. परंतु ते दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भूमिका मांडत असतील तर त्याला आमचं समर्थन नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I am not alone – Chhagan Bhujbal 

छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “मी एकटा पडलो नाही. राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. काही नेत्यांची अडचण झाली असेल.

आम्ही भुजबळांच्या ( Chhagan Bhujbal ) स्टेजवर जाणार नाही, असं काही लोक म्हणतात. माझ्या स्टेजवर नका येऊ, काही हरकत नाही. मात्र, तुम्ही स्वतःच्या बैठका घ्या. ओबीसी बचाव आंदोलन तुम्ही राज्यात चालू ठेवा, एवढीच माझी त्यांना विनंती आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. “मी छगन भुजबळ यांना सेनापती म्हटलेलं नाही. ते कसले सेनापती? आणि त्यांना मी का सेनापती म्हणू?

आमचे सेनापती खर्गे साहेब आणि राहुल गांधी आहे. मी ओबीसींचे नेते म्हणून त्यांना बोललो आहे. त्यांनी ओबीसी समाजाला प्रबोधन करण्यासाठी मेळावा घेतला आणि हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.

परंतु, त्यांनी ( Chhagan Bhujbal ) ज्या पद्धतीने टोकाचं वक्तव्य केलं आहे, त्याला माझ्या समर्थन नाही”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही