Manoj Jarange | ठाणे: मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.
अशात पुन्हा एकदा मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी छगन भुजबळ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. जातीमध्ये तेढ निर्माण करणं हा भुजबळांचा विचार आहे, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.
We are not pushing reservation of OBC community – Manoj Jarange
ठाण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत नाही. आम्ही पूर्वीपासूनच त्या ठिकाणी आहोत. त्यांनीच आम्हाला धक्का लावलेला आहे.
आम्ही ( Manoj Jarange ) आमचं आरक्षण घेत आहोत. जातींमध्ये तेढ निर्माण करणं, हा त्यांचा आधीपासूनच विचार आहे. राज्यामध्ये शांतता राहावी, यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत.
आम्ही प्रशासनाची बाजू मांडत आहोत. राज्यात शांतता राहू द्या, असं प्रशासनाने म्हणायला हवं. मात्र, शांततेत आंदोलन करू, असं आम्ही 24 तास म्हणत आहोत.
यानंतर सरकार खुश पाहिजे. ओबीसी समाजाचा एक नेता राज्यात शांतता राहू नये, म्हणून काम करत आहे. अशात सरकारने मराठा समाजाला शाब्बासकी दिली पाहिजे.
कारण मराठा समाज रात्रंदिवस जागून राज्यात शांतता प्रस्थापित करत आहे. आम्ही शांततेत कार्यक्रम करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात ठेवून मराठा समाज आंदोलन करत आहे. त्यामुळे गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याची गरज काय आहे?”
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | 24 तारखेला नेमकं काय नियोजन आहे? मनोज जरांगे म्हणतात…
- Chhagan Bhujbal | मी एकटा पडलो नाही, संपूर्ण ओबीसी समाज माझ्या पाठीशी; भुजबळांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर
- Sanjay Raut | हातात सीबीआय आणि ईडी आहे, म्हणून भाजपची मर्दानगी जागी – संजय राऊत
- Chhagan Bhujbal | मी इतर लोकांप्रमाणे गाव बंदी वगैरे काही केलेली नाही; भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना डिवचलं
- Uddhav Thackeray | ‘मोदी’ स्टेडियमवर अपयश आले म्हणून टीम इंडियाने खचून जाऊ नये; ठाकरे गटाची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










