Manoj Jarange | ठाणे: मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.
आज ते ठाणे दौऱ्यावर आहे. ठाण्यातील सभेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य शासनाला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला धरून एक प्रश्न विचारला आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे का? असा सवाल जरांगे ( Manoj Jarange ) यांनी उपस्थित केला आहे.
Law and order must remain intact – Manoj Jarange
मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम प्रशासनाचं आहे. परंतु, सध्या हे काम मराठा समाज करत आहे.
राज्यात शांतता राहावी, यासाठी रात्री बंदोबस्त लावला जातो. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, यासाठी पोलीस रात्रंदिवस जागत असतात.
मराठा समाज देखील हेच करत आहे. शांतता राखा, हे सांगण्यासाठी मराठ्यांना दिवस कमी पडतोय, म्हणून आम्ही रात्री देखील जनतेला हे सांगत आहोत. ही प्रशासनासाठी चांगली बाब आहे.
मात्र, प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करताना दिसत आहे. तुम्हाला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे का? असा माझा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे.
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद होऊ नये, यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. जातीमध्ये तेढ निर्माण करून सरकारला दंगली घडवून आणायच्या आहे का?
लोकांना शांततेत राहा, म्हणून आम्ही सांगत आहोत. ही आमची चूक आहे का? तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार नाही. मराठा समाजावर गुन्हे दाखल केल्यानंतर मराठा समाज घाबरणार, खचणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी नाही, तर मग कुणी दिले? – मनोज जरांगे
- Manoj Jarange | जातीमध्ये तेढ निर्माण करणं हा भुजबळांचा विचार – मनोज जरांगे
- Manoj Jarange | 24 तारखेला नेमकं काय नियोजन आहे? मनोज जरांगे म्हणतात…
- Chhagan Bhujbal | मी एकटा पडलो नाही, संपूर्ण ओबीसी समाज माझ्या पाठीशी; भुजबळांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर
- Sanjay Raut | हातात सीबीआय आणि ईडी आहे, म्हणून भाजपची मर्दानगी जागी – संजय राऊत