Manoj Jarange | मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी नाही, तर मग कुणी दिले? – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | कल्याण: काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण केलं होतं.

त्यांच्या या उपोषणादरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिलेल्या आदेशावरून हा लाठीचार्ज झाला असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

अशात आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते, हे स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Find that man – Manoj Jarange

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “लाठीचार्ज करण्याचा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला नाही, तर मग कोणी दिला आहे? सरकारचा गैरवापर करणारा हा अधिकारी कोण? हे शोधायला हवं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या माणसाला शोधून काढा. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्याला बक्षीस मिळालं असेल.

त्याचबरोबर निष्पाप जनतेवर हल्ला करणाऱ्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती मी घेईल. या मुद्द्यावर न्यायालयीन चौकशी होणार आहे. यातून कुणाचीही सुटका होणार नाही. कारण त्यांनी निष्पाप लोकांवर हल्ला केला आहे.”

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे.

तत्पूर्वी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) राज्यामध्ये दौरे करत आहे. आज ते ठाणे शहरात दाखल झाले आहे. 24 डिसेंबर पर्यंत सरकार आम्हाला शंभर टक्के आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe