PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी करून घ्या ‘हे’ काम

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीदरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता पाठवला आहे.

देशातील आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या ( PM Kisan Yojana ) योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. अशात काही शेतकऱ्यांना या योजनेतील 15 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे.

या शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्हाला हा हप्ता मिळाला नसेल तर खाली दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेतील ( PM Kisan Yojana ) पुढचा हप्ता मिळवू शकतात.

पीएम किसान योजनेतील ( PM Kisan Yojana ) पुढच्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही ती त्वरित पूर्ण करून घ्यावी.

त्याचबरोबर या योजनेतील ( PM Kisan Yojana ) पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणं आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अजून या गोष्टी पूर्ण केलेल्या नाही, त्यांनी लवकरात लवकर या गोष्टी पूर्ण करून घ्याव्या. या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेतील ( PM Kisan Yojana ) पुढचा हप्ता मिळू शकतो.

Pm Kisan Yojana helpline number

दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना ( PM Kisan Yojana )  सुरू केली आहे.

या योजनेशी ( PM Kisan Yojana ) संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155661, 1800115526 किंवा 01123381092 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करू शकतात. त्याचबरोबर pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीच्या आधारे तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.