Manoj Jarange | भुजबळांनी कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलंय? मला सगळं माहितीये – मनोज जरांगे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | नाशिक: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे आमने-सामने आले आहे.

कारण मराठ्यांनी केलेल्या मागणीला ओबीसी समाजासह ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे ( Manoj Jarange ) आणि भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात नाशिकमध्ये झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

I know everything – Manoj Jarange

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “माझ्या जातीमध्ये वाटा केला तर मी कुणालाही सोडणार नाही. ते मराठ्याचं असलं तरी सोडणार नाही. त्यांना माझं सगळं माहित आहे.

त्याचबरोबर मला देखील त्यांचं सगळं माहित आहे. ते कुठे भाजी विकत होते आणि कुठे काय करत होते? मला सगळं माहित आहे. त्यांनी मुंबईत कोणत्या नाटकात आणि कोणत्या चित्रपटात काम केलंय? मला सगळं माहित आहे.

त्याचबरोबर त्यांनी कुणाचा बंगला हडपला आहे? मला माहित आहे.” मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतील? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

सरकार मराठ्यांना 24 डिसेंबर पर्यंत शंभर टक्के आरक्षण देणार, असा विश्वास जरांगे ( Manoj Jarange ) यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तत्पूर्वी या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. अशात सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या