Arjun Tendulkar | अखेर प्रतीक्षा संपली! अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण

Arjun Tendulkar | मुंबई: आज (16 एप्रिल) आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या दोन वर्षापासून चाहते त्याच्या पदार्पणाची वाट बघत होते.

आजच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या जागी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईचे कर्णधार पद सांभाळत आहे. या सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेयरमध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चे नाव आहे, तो आज मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.

मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला यंदाच्या लिलावात 30 लाख रुपयांनी आपल्या संघात सामील केले. होते. गेल्या दोन वर्षापासून हा खेळाडू संधीची वाट बघत होता. त्याची ही प्रतीक्षा संपलेली असून, तो आज मैदानावर उतरला आहे. आयपीएल 2018 च्या मेगा लिलावात मुंबईने त्याला सर्वप्रथम संघात सामील केले होते. परंतु, त्याला आजपर्यंत एकही सामना खेळता आला नव्हता.

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ (Mumbai Indians team in today’s match)

इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पीयूष चावला, ड्वेन यान्सेन, रिले मेरेडिथ

आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders in today’s match)

रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.