Prickly Heat | घामोळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Prickly Heat | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यात घामोळ्याच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना घामोळ्यांच्या समस्यांचा त्रास होतो. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले पावडर, लोशन आणि क्रीम वापरतात. मात्र, हे उपाय दीर्घकाळ घामोळ्यांना दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे घामोळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपाय करू शकतात. उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक उपाय करू शकतात.

कडुलिंबाची पेस्ट (Neem paste-For Prickly Heat)

कडूलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात, जे घामोळ्यांच्या समस्येवर मात उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुम्हाला कडुलिंब बारीक करून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटं घामोळ्यांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट थंड पाण्याने धुवावे लागेल. उन्हाळ्यामध्ये नियमित या पेस्टचा वापर केल्याने घामोळ्या आणि जळजळ दूर होऊ शकते.

मध (Honey-For Prickly Heat)

घामोळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी मध मदत करू शकतो. मधामध्ये आढळणारे अॅंटीबॅक्टरियल गुणधर्म घामोळ्या दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला घामोळ्यांवर साधारण दहा मिनिटे मध लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तो भाग थंड पाण्याने धुवावा लागेल. घामोळ्यांवर मध लावल्याने घामोळ्या सहज दूर होऊ शकतात.

चंदन पावडर आणि गुलाब जल (Sandalwood powder and rose water-For Prickly Heat)

चंदन पावडर आणि गुलाब जल दोन्हीही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दोन्हीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला थंडावा प्रधान करतात. घामोळ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये दोन चमचे गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तो भाग सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने घामोळ्या आणि जळजळ दूर होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक उपाय करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करू शकतात.

दही (Curd-For Weight Loss)

दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन आणि विटामिन बी12 भरपूर प्रमाणात आढळून येते, जे उन्हाळ्यामध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते. दही खाल्ल्याने पचनक्रिया देखील मजबूत होऊ शकते.

टरबूज (Watermelon-For Weight Loss)

उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी टरबूज एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. टरबुजामध्ये आयरन, फायबर, सोडियम आणि पोटॅशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. टरबूजामध्ये आढळणारे पाणी शरीरातील चरबी लवकरात लवकर कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन करण्यासाठी टरबूज उपयुक्त ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.