Nana Patole | नरेंद्र मोदी पनौती, राहुल गांधींनी फक्त सार्वजनिक मत मांडलंय – नाना पटोले

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला.

हा सामना बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) स्टेडियममध्ये उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी पीएम मोदींवर खोचक टीका केली आहे.

पनौती तिकडे गेला आणि भारत हरला, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले ( Nana Patole ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gandhi has only expressed a public opinion – Nana Patole

नाना पटोले ( Nana Patole ) म्हणाले, “राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता पनौती हा शब्द वापरला आहे. राहुल गांधींनी पनौती म्हटलं, म्हणजे नरेंद्र मोदींचा अपमान झाला, असं भाजप गृहीत धरत आहे.

मात्र, सोशल मीडियावर पनौती हा शब्द धुमाकूळ घालत आहे. त्यामुळं राहुल गांधींनी फक्त सार्वजनिक मत मांडलं आहे. राहुल गांधींनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे भाजपला हा शब्द एवढा का लागला आहे? काय माहित?.”

दरम्यान, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना जिंकला असता.

मात्र, त्यादिवशी पनौती तिथे उपस्थित होती. त्या पनौतीमुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. या सर्व गोष्टी टीव्हीवर दाखवता येत नाही. पण भारतीय संघ का हरला? याचं कारण संपूर्ण देशाला माहित आहे”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.