Maratha Reservation | ओबीसी समाज आक्रमक; बुलढाण्यात जाळला मनोज जरांगेंचा प्रतिकात्मक पुतळा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | बुलढाणा: मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची दिसून आली आहे.

अशात बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाण्यामध्ये मनोज जरांगे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी ( Maratha Reservation ) प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजासह ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर मंत्री छगन भुजबळ राज्यात जागोजागी ओबीसी एल्गार मेळावे घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळावं, यासाठी राज्यात सभा घेत आहे.

अशात बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे. त्याचबरोबर यावेळी ओबीसी समाजाने मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

या घटनेनंतर मराठा ( Maratha Reservation ) आणि ओबीसी वाद आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Will the government give reservation to Marathas from OBC?

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे.

या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण ( Maratha Reservation ) दिलं नाही तर मोठं आंदोलन होईल, असा इशारा जरांगे यांनी राज्य शासनाला दिला आहे.

अशात ओबीसी समाज देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. या सर्व घटनांनंतर राज्य सरकार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ( Maratha Reservation ) देणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या