Raj Thackeray | निवडणुकांच्या तयारीला लागा, आरक्षणाच्या वादात पडू नका; मनसे नेत्यांना राज ठाकरेंचा आदेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | मुंबई: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसह राज्यातील सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

निवडणुकांच्या तयारीला लागा, आरक्षणाच्या वादात पडू नका, अशा सूचना राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळाली आहे.

Don’t get into reservation disputes – Raj Thackeray

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण अत्यंत तापलेलं आहे. अशात आज राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी ( Raj Thackeray ) सांगितलं आहे. त्याचबरोबर या बैठकीमध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत.

आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा, आरक्षणाच्या वादात पडू नका, असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे. मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यात सुरू केलेलं आंदोलन आज संपूर्ण राज्यात पसरलं आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असं मराठा समाजाने म्हटलं आहे. अशात या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

दोन दिवसात ही मुदत संपणार आहे. या कालावधीमध्ये सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करू, असा इशारा जरांगे यांनी राज्य शासनाला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या