Manoj Jarange | ओबीसी समाजाने शांतता ठेवली नाही तर आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल – मनोज जरांगे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | अहमदनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये मोठं आंदोलन सुरू केलं आहे.

अशात मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात या मुद्द्यावर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी समाजाने शांतता ठेवली नाही तर आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Why would people support him? – Manoj Jarange

अहमदनगर जिल्ह्यातील सभेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

ते ( Manoj Jarange ) म्हणाले, “एका माणसाने आमच्या परिसरामध्ये जाऊन एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो माणूस मुंबईला पोहोचेपर्यंत चार माणसं फुटले होते. त्याचा आणि आमचा काही संबंध नाही, असं म्हणून लोकांनी माघार घेतली.

तो म्हातारा माणूस कोणालाही कुठेही घेऊन जातो आणि काहीही बरळत असतो. त्यामुळे लोक त्याला का पाठिंबा देतील? मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही.

ज्यांची लायकी आहे, मी फक्त त्यांचं नाव घेतो. ज्याची लायकी नाही त्याचं मी नाव घेत नाही. तो माणूस सगळ्या दुनियेचं खातो आणि कमी पडलं असं म्हणतो.”

पुढे बोलताना ते ( Manoj Jarange ) म्हणाले, “त्या माणसाने येवल्यात त्याच्या माणसांना आमचे बॅनर फाडायला सांगितले आहे. त्याच्या कार्यकर्त्यांनी येवल्यामध्ये आमचे बॅनर फाडले आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे.

सरकारने याबाबत तपास करायला हवा. त्या माणसाला समज द्या, असं मी अजित पवारांना ( Ajit Pawar ) सांगू इच्छित आहे. आम्हाला त्या माणसाच्या विरोधात बोलायला लावू नका. तो माणूस थांबला नाही तर आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल. त्यानंतर तुम्ही आमच्या नावाने खडे फोडायचे नाही.”

महत्वाच्या बातम्या