Sushma Andhare | अपयशी भाजपने चर्चेच्या केंद्रस्थानी ‘आरक्षण’ शब्द आणलाय – सुषमा अंधारे

Sushma Andhare | मुंबई: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

यानंतर दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. अशात ठाकरे गटाचा नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

अपयशी भाजपने चर्चेच्या केंद्रस्थानी ‘आरक्षण’ शब्द आणला आहे, असं म्हणत सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

They don’t want to give reservation – Sushma Andhare 

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) म्हणाल्या, “केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष दोन समाजामध्ये झुंज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोंबडा-कोंबडीला दाना टाकून झुंजवणे जे म्हणतात ना, तेच भारतीय जनता पक्ष करत आहे. महाराष्ट्रातील महिला सुरक्षेची दुरावस्था, बेरोजगारी, कंत्राटी भरती, दुष्काळ परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व प्रश्नांवर भारतीय जनता पक्ष अपयशी ठरलेला आहे.

अपयशी भाजपला या सर्व मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करायचं आहे. त्यामुळे अपयशी भाजपने चर्चेच्या केंद्रस्थानी ‘आरक्षण’ शब्द आणला आहे. त्यांना हे आरक्षण द्यायचं नाहीये. या मुद्द्यावरून त्यांना फक्त वेगवेगळ्या जातींमध्ये वाद घडवून आणायचे आहे.”

दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.