Abdul Sattar | “मी ‘कुत्रा’ निशाणीवर जरी लढलो, तरी जिंकणार” : अब्दुल सत्तार

Abdul Sattar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath shinde) बंड केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं वळण मिळालं. राज्यात शिंदे- भाजप सरकार स्थापन झालं. तर दुसरीबाजूला शिंदे – ठाकरे गटातील नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू झाले. गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल येत्या 11 किंवा 12 मे पर्यंत कधीही लागू शकतो अशी शक्यतक वर्तवली जातेय. तर 16 आमदार जर अपात्र झाले तर नक्कीच राजकारणात मोठी घडामोडी झालेली पाहायला मिळणार आहे. या सर्व प्रकारावर देशातील सर्वांच लक्ष लागलं आहे. असं असताना देखील राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वेगळंच वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ( What did Abdul Sattar say)

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीबाबत काय भूमिका असणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल देखील भाष्य केलं आहे. सत्तार म्हणले की, निकालानंतर काहीही निर्णय आला तरी त्याचा मला फरक पडणार नाही. कारण जर आमचे कॅप्टन ( एकनाथ शिंदे) गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच उरत नाही. जर 16 आमदार अपात्र झाले तर मध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A , प्लॅन B असतो. पण सगलकज प्लॅन नुसार घडतं नाही. मला या गोष्टीची परवा नाही कारण आम्ही इतिहास घडवला आहे याची पाने देखील लिहली आहेत. आम्ही जो काही निकाल येईल तो हसत खेळत मान्य करणार. तसचं “मी कुत्रा निशाणीवर लढलो तरी सत्तार आमदार पक्का”, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. सत्तार यांना आपण पुन्हा आमदार म्हणून जिंकून येणार याची खात्रीया असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत.

दरम्यान, सत्तारांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर देखील भाष्य केलं. सत्तार म्हणाले की, शरद पवार साहेब हुशार आहेत. त्यांनी भाकरी फिरवण्याऐवजी तवाच पलटी मारला. शेवटी त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. असं ही सत्तार म्हणाले. तर आता महाविकास आघाडीची एकजूट कमी झालेली पाहायला मिळते त्याला फक्त कारण सकाळचा भोंगा आहे. अशा शब्दांत संजय राऊत यांच्यावर देखील सत्तार यांनी निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button