Nana Patole | ‘पनौती’ म्हटल्यावर भाजपला का झोंबलं? – नाना पटोले

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक सामन्यानंतर सोशल मीडियावर पनौती हा शब्द धुमाकूळ घालत होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यावर याच शब्दावरून नाव न घेता टीका केली.

पनौती तिकडे गेला म्हणून भारतीय संघाचा पराभव झाला, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता.

याच पार्श्वभूमीवर नाना पटोले ( Nana Patole ) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘पनौती’ म्हटल्यावर भाजपला का झोंबलं? असा सवाल नाना पटोले ( Nana Patole ) यांनी उपस्थित केला आहे.

Rahul Gandhi did not name Narendra Modi or any person – Nana Patole

नाना पटोले ( Nana Patole ) म्हणाले, “‘पनवती’ म्हटल्यावर भाजपला का झोंबले? राहुल गांधी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच पनवती…पनवती असा आवाज येत होता.

त्यासंदर्भाने राहुल गांधी बोलले, त्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी अथवा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही तरीही भाजपाला ते का झोंबले? त्यातून मोदींचा अपमान कसा होतो”

पुढे ते ( Nana Patole ) म्हणतात, “अहमदाबाद स्टेडियमवरील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅच दरम्यान ‘पनवती’ हा शब्द सोशल मीडियावर ‘ट्रेंड’ झाला होता.

आजही तो ‘ट्रेंड’ होत आहे, ती एक जनभावना आहे पण सर्वठिकाणी मीच आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.”

दरम्यान, राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. “एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना भारतीय संघ जिंकला असता.

मात्र, पनौती तिथे होती, म्हणून भारतीय संघाला हार स्वीकारावी लागली. भारतीय संघ पराभूत का झाला? याचं कारण संपूर्ण भारताला माहित आहे. पण हे टीव्हीवर दाखवता येत नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.