Weather Update | राज्यात मुंबईसह काही भागात पावसाची शक्यता; बघा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.

मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने ( Weather Update ) दिला आहे. देशातील वातावरण बिघडताना दिसत आहे, त्यामुळे हवामान खात्याने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

A low pressure area has formed in the Bay of Bengal

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वातावरणात बदल होताना दिसत आहे. येत्या 24 तासांमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.

त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने ( Weather Update ) दिला आहे.

Benefits of Ghee

दरम्यान, ऐन थंडीच्या दिवसात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मिसळून तुपाचे सेवन करू शकतात.

नियमित याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, सांधेदुखी पासून आराम मिळतो, त्याचबरोबर वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे या वातावरणात निरोगी राहण्यासाठी तुम्ही नियमित सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे कोमट पाण्यात मिसळून सेवन करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.