Amol Kolhe | अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार? अपात्र यादीतून वगळलं नाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे.

तर दुसरीकडे शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा, अशी मागणी अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्यसभा सभापतीकडे केली आहे.

याबाबत अजित पवार गटाने याचिका देखील दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खासदार अपात्रतेच्या याचिकेतून अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) सुप्रिया सुळे ( Supriya Sule ), यांच्यासह शरद पवार ( Sharad Pawar ) यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

Disqualify MPs from Sharad Pawar group

शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा, अशी मागणी अजित पवार गटाने केली होती. यासाठी अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका देखील दाखल केली होती.

यानंतर या याचिकेतून अमोल कोल्हे ( Amol Kolhe ), शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. या घटनेनंतर खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe )  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहे.

या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. यानंतर अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) अजित पवार गटात जाणार का? असं देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

दरम्यान, 2 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार ( Ajit Pawar ) शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत आलेल्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले.

यानंतर खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. परंतु, आता ते अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या