Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? दिल्लीत होणार महायुतीची महत्त्वाची बैठक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये मोठं आंदोलन सुरू केलं आहे.

या मुद्द्यावर ( Maratha Reservation ) निर्णय घेण्यासाठी त्यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर ( Maratha Reservation ) महायुतीची दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

Mahayuti’s meeting will be held in Delhi

राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. 24 डिसेंबर पर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही तर राज्यामध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा मराठ्यांनी ( Maratha Reservation ) राज्य शासनाला दिला आहे.

यानंतर दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या बैठकीला भाजप, शिंदे गट अजित पवार गट यांच्यासह महायुतीतील छोट्या पक्षांना सामील केलं जाईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

त्याचबरोबर या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा तिढा सुटणार असल्याच्या चर्चा देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, मराठा समाजाने केलेल्या मागणीवरून मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या विरोधानंतर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे. या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

महत्वाच्या बातम्या