Ajit Pawar | अजित पवारांचा मराठ्यांच्या मागणीला विरोध? मोठ्या नेत्यांने दिली कबुली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत तापलेलं आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात केली आहे.

मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू असताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी त्यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ राज्यामध्ये जागोजागी मेळावे घेताना दिसत आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे राज्यभर सभा घेताना दिसत आहे. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका केली आहे.

अशात प्रहारचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी यावरून मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ आणि अजित पवार ( Ajit Pawar ) यांची भूमिका एकच असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

The role of Chhagan Bhujbal and Ajit Pawar is the same – Bacchu Kadu

बच्चू कडू म्हणाले, “छगन भुजबळ वरिष्ठांच्या पाठिंब्याशिवाय बोलू शकत नाही. छगन भुजबळ आणि अजित पवार ( Ajit Pawar ) यांची भूमिका एकच आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.

काँग्रेस आणि भाजप ओबीसीचं नेतृत्व करू पाहत आहे. मात्र दोन्ही पक्षांना छगन भुजबळ यांनी मागे टाकलं आहे. भाजप आणि काँग्रेसवर छगन भुजबळ भारी झाले आहे.”

दरम्यान, मराठा समाजाने केलेल्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना दिसले. त्यांच्या या टीकेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली.

मात्र, अजित पवारांनी ( Ajit Pawar ) यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. यानंतर बच्चू कडू यांनी छगन भुजबळ आणि अजित पवार ( Ajit Pawar ) यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका एकच असल्याचं म्हटलं आहे.

यावरून अजित पवारांचा ( Ajit Pawar ) मराठा समाजाच्या मागणीला विरोध आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या