Gas Cylinder | भाजपचा महाराष्ट्रावर अन्याय; राजस्थानमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 450 रुपयात देण्याचा वादा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gas Cylinder | टीम महाराष्ट्र देशा: राजस्थानमध्ये निवडणुकांची चाहूल लागली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते राजस्थानमध्ये प्रचार करायला गेले आहे.

या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ( Gas Cylinder ) 450 रुपयात देण्याचा वादा केला आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी भारतीय जनता पक्षावर सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला भारतीय जनता पक्ष 450 रुपयात सिलेंडर ( Gas Cylinder ) केव्हा देईल? असा सवाल विलास मुत्तेमवार यांनी उपस्थित केला आहे.

When will the people of Maharashtra get a gas cylinder for Rs 450?

भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते राजस्थानमध्ये प्रचार सभा घेताना दिसत आहे. या प्रचार सभेदरम्यान भाजपने राजस्थानमधील जनतेला घरगुती गॅस सिलेंडर ( Gas Cylinder ) 450 रुपयात देण्याचा वादा केला आहे.

याच पार्श्वभूमीवर विलास मुत्तेमवार यांनी भाजपला धारेवर धरलं आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून महाराष्ट्रातील जनतेला 450 रुपयात गॅस सिलेंडर ( Gas Cylinder )  का मिळत नाही?

महाराष्ट्रातील जनतेला 450 रुपयात कधी गॅस सिलेंडर ( Gas Cylinder ) मिळेल? असा प्रश्न विलास मुत्तेमवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी राजस्थानमध्ये दाखल झाले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

“एकनाथ शिंदे यांना राजस्थानमध्ये प्रचार करू द्या. पुढच्या वर्षी अमेरिकेच्या निवडणुका होणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर युरोपमधील 7 राष्ट्रांच्या निवडणुका होणार आहे.

एकनाथ शिंदे एवढे मोठे नेते आहे की त्यांच्या अमेरिकेमध्ये सभा लावल्या जाणार आहे. त्याचबरोबर फ्रान्समध्ये होणाऱ्या निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं जाईल”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या