Manoj Jarange | 24 डिसेंबरला आरक्षण मिळालं नाही तर, लढायला तयार राहा – मनोज जरांगे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | बीड: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी त्यांनी ( Manoj Jarange ) राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) राज्यामध्ये सभा घेताना दिसत आहे. अशात बीडमध्ये सभेदरम्यान मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य शासनाला पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून इशारा दिला आहे. 24 डिसेंबरला आरक्षण मिळालं नाही तर, लढायला तयार राहा, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

I am very proud of my caste – Manoj Jarange 

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाने प्रचंड मोठा उठाव केला आहे. राज्यामध्ये मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहे. त्यामुळे आपलं हे आंदोलन इथेच यशस्वी झालं आहे.

मी माझी माझ्या जातीसाठी जिद्द सोडलेली नाही. मला माझ्या जातीचा सार्थ अभिमान आहे. माझ्या मराठा समाजाने त्यांच्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र एक केला आहे.

मराठा समाजाचं शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाने आता गाफील राहू नये. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर रोजी कायदा पारित होणार आहे.

24 डिसेंबरला शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आपल्याला पुढे लढायला तयार राहावं लागणार आहे. कारण आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. हे आपल्या हक्काचं आरक्षण आहे.”

यावेळी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, “माझं ( Manoj Jarange ) सगळीकडे बारीक लक्ष असतं.

मी त्यांना काही सुचू देत नाहीये. माझ्यामुळे तो म्हातारा पागल होऊ लागला आहे. तो माणूस आज काही बोलतो आणि उद्या काही बोलतो. तो बधिर झाला आहे. त्याने आमच्या परिसरात येऊन सभा घेतली. शांत बसायचं तर तो शांत देखील बसला नाही.”

महत्वाच्या बातम्या