Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकरी मिळवू शकतात लाखांचं कर्ज; जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kisan Credit Card | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी इत्यादींमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

अशात शेतकऱ्यांना कर्ज काढून उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळं देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.

त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारची काम करत असते. यापैकीच एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card ).

किसान क्रेडिट कार्डद्वारे ( Kisan Credit Card ) शेतकरी कमी व्याज दरात कर्ज मिळवू शकतात. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी सहजपणे तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

Farmers can get loans at low interest rates through Kisan Credit Card

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card ) घेऊन आले आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकरी तीन लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात.

कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज दरात तीन टक्के पर्यंत सूट देण्यात येते. त्याचबरोबर या कर्जावरील व्याजदर 7 टक्क्यांपासून सुरू होतो.

18 ते 75 वर्षे वय असणारे शेतकरी या क्रेडिट कार्डचा ( Kisan Credit Card ) लाभ घेऊ शकतात. हे कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान दोन एकर शेती असावी लागते.

या क्रेडिट कार्डच्या ( Kisan Credit Card ) माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधवांना बँकेत खातं असणं अनिवार्य आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जमिनीची कागदपत्रे, बँक खात्याची माहिती आणि शिधापत्रिका इत्यादी कागदपत्रांची गरज लागते. तुमच्याकडे ही सर्व कागदपत्र असतील तर तुम्ही किसान क्रेडिट कार्डचा ( Kisan Credit Card )लाभ घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या