Government Scheme | पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात मदत करतील सरकारच्या ‘या’ योजना, जाणून घ्या

Government Scheme | टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी उत्पादनात वाढ करत आहे. देशातील शेतकरी शेतीसोबतच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, आणि मत्स्यपालन इत्यादी जोड व्यवसाय करत असतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. त्यामुळे या व्यवसायामध्ये मदत मिळावी म्हणून सरकारने काही योजना राबविल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळू शकते. पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन या व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी सरकारने पुढील योजना राबविल्या आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन

स्वदेशीचा नारा देत देशात स्वदेशी उत्पादनांचा प्रचार केला जात आहे. दरम्यान, सरकारलाही देशातील पशुधनाचे महत्व समजले आहे. त्यामुळे स्थानिक पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू करण्यात आले आहे. देशातील दुधाची वाढती मागणी पाहता, लहान शेतकरी या योजनेसोबत जोडले गेले आहेत. देशी गाईचे संगोपन करून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी या मिशनसाठी अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय पशुधन अभियान

2014 मध्ये केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले होते. या योजनेचा लाभ लाखो शेतकरी घेऊ शकतात. या योजनेद्वारे गाय-म्हैस, शेळी, डुक्कर, ससा, मेंढ्या आणि कुक्कुटपालनाला चालना दिली जाते. या योजनेमध्ये पशुखाद्यावर आधारित उपक्रमांनाही मदत केली जाते. शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पशुधन विमा योजना

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर पशुपालनामध्ये देखील अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना जनावरांमध्ये लाखो रुपये गुंतवावे लागतात. रोगराई, हवामान, आजार आणि अपघात यामुळे शेतकऱ्याची जनावरे संकटात सापडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या