🕒 1 min read
Manoj Jarange | मुंबई: राज्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. त्यांचं हे आंदोलन सुरू असताना त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे.
मराठ्यांनी केलेल्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी छगन भुजबळ राज्यामध्ये सभा घेत आहेत. यानंतर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि छगन भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यासह कुणीही भडकाऊ भाषण करू नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर जरांगेंनी ( Manoj Jarange ) प्रतिक्रिया दिली आहे.
We have controlled our speech – Manoj Jarange
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “आम्ही आमचं बोलणं कंट्रोल केलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या माणसाला समज दिली तर चांगलं होईल.
त्यांचे माणसं थांबत नाहीये. त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. मुंबईमध्ये सभा घेण्यासाठी आमचं नियोजन सुरू आहे. लवकरच याबद्दल फायनल होईल.”
दरम्यान, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या आरोप प्रत्यारोपावरून राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनोज जरांगे यांच्यासह कोणीही भडकाऊ भाषण करू नये. भाषण करत असताना त्यात काय शब्द वापरायला हवे? हे प्रत्येकाने बघायला हवं.
प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. परंतु, ते मांडत असताना जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी, अशी माझी सर्वांना विनंती आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | मनोज जरांगे यांच्यासह कुणीही भडकाऊ भाषण करू नये – अजित पवार
- Uddhav Thackeray | ‘पनौती’ म्हणजे काय रे भाऊ? ठाकरे गटानं पुन्हा एकदा भाजपला डिवचलं
- Tomato Benefits | बदलत्या हवामानात टोमॅटोचे सेवन करणे तुमच्यासाठी ठरू शकते फायदेशीर
- Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकरी मिळवू शकतात लाखांचं कर्ज; जाणून घ्या सविस्तर
- Vijay Wadettiwar | जिथे निवडणुका तिथे लुटमार, हा भाजपचा नवीन धंदा – विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











