2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल – देवेंद्र फडणवीस

2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी आणि उर्वरित 50 टक्के गरज EVमधून भागवली जाईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Published On: 

Devendra Fadnavis BJP meeting

पुणे : पुण्यात आज भाजपच्या (BJP) कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या बैठकीला संबोधित केले आणि त्यादरम्यान पेट्रोल (Petrol) व डिझेलबाबत (Diesel) एक महत्त्वपूर्ण विधान केले.

पेट्रोल-डिझेलबाबत देवेंद्र फडणवीसांनी मोठा दावा केला आहे. “भारत आज पेट्रोल-डिझेलसाठी पूर्णपणे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. आज आपले पेट्रोल-डिझेलसाठी अवलंबित्व आहे. मला विश्वास आहे, 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल आणि 50 टक्के गरज EV च्या माध्यमातून भागवली जाईल.” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis BJP meeting

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “भारत आत्मनिर्भरतेकडे चालला आहे. आत्मनिर्भरतेकडे जाणारा हा भारत जगातल्या काही शक्तींना आवडत नाही आहे. भारताला आज रोखलं नाही, तर यापुढे रोखता येणार नाही. म्हणून त्यांनी कार्यपद्धती बदलली आहे. आज ज्यांचा उपयोग होत आहे. त्यांच्यापैकी 5 टक्के लोकांना माहिती आहे आपला उपयोग होत आहे. ते जाणीवपूर्वक अशा शक्तींना साथ देत आहेत.”

“आपल्याला छत्रपती शिवरायांनी लढायला शिकवले. शिवरायांची सेना उतरली की एकच नारा द्यायची ‘हर हर महादेव’ आता तशाच प्रकारची चढाई करण्याची वेळ पुन्हा एकदा येत आहे. हे आक्रमक नवीन नाहीत किंवा आक्रमण करणारे नवीन नाहीत. विषय पण नवीन नाही फक्त त्यांची कार्यपद्धती बदललेली आहे.” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, “ही कार्यपद्धती समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा-जेव्हा शत्रुने वेगवेगळ्या पद्धतीने स्वराज्यावर हल्ले केले, त्या त्यावेळी शिवरायांनी देखील गनिमीकाव्यापासून गुप्तहेराचा वापर करून शत्रुचा नायनाट केला. मी विरोधकांना शत्रू म्हणणार नाही. विरोधक नव्या कार्यपद्धतीचा अवलंब करत आहेत. ती समजून घ्यावी लागेल.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जी घोडदौड चालू आहे, जगातली चौथी अर्थव्यवस्था म्हणून भारत तयार झाला आहे, आत्मनिर्भरतेकडे आपण जातोय. शस्त्रांसाठी भारताला कोणावर अवलंबून रहावं लागत नाही.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही