Share

‘पुणेकरांनी या वादात न पडता उत्सव साजरा करा’; DJच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आवाहन

गणेशोत्सवातील DJच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

Published On: 

CM Devendra Fadnavis on Ganeshotsav DJ

पुणे : दरवर्षी गणेशोत्सवाच्या (Ganshotsav) काळात संभाव्य ध्वनीप्रदूषणाचा आणि डीजे (DJ) यंत्रणेमुळे होणारा आवाज हा चर्चेचा विषय ठरतो. डीजे रात्री १० वाजेपर्यंत वाजवू द्यायचे की १२ वाजेपर्यंत? मिरवणुकीदरम्यान त्यांच्या वापरासाठी अतिरिक्त वेळ दिला जावा का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

या चर्चा सुरू असतानाच आणि पुण्यात विद्यानंद बापट डीजेचा वापर व त्यातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत सातत्याने चिंता व्यक्त करत असताना. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात आयोजित भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांनी शहरातील नागरिकांना डीजेच्या वापराबाबत आवाहनही केले.

CM Devendra Fadnavis on Ganeshotsav DJ

पुण्यातील डीजेच्या (DJ) वापराबाबत, देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना गणेशोत्सव सांस्कृतिकदृष्ट्या योग्य पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

“मी पुणेकरांना सांगू इच्छितो की पुण्यातच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. त्यामुळे माझं पुणेकरांना आवाहन आहे की या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे, की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जातो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात डीजेच्या (DJ) वापराबाबत पुण्यात निषेध व्यक्त केला जात आहे. सण कोणत्याही धर्माचा असला तरी डीजेचा कर्णकर्कश्श्य आवाज नको, अशी भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली आहे. यासंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी पुणेकर करत आहेत.

डीजेविरोधात बापट चर्चेत

पुण्यात डीजेच्या (DJ) वापराबाबत वाढता विरोध हा चर्चेचा विषय ठरला असतानाच, या विरोधाचा चेहरा बनलेले विद्यानंद बापट हे देखील प्रकाशझोतात आले आहेत. बीपीओ (BPO) क्षेत्रातील ३७ वर्षीय व्यावसायिक असलेल्या आणि कोणतीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसलेल्या बापट यांनी, पुण्याच्या गणेशोत्सवात डीजेच्या वापराबाबत ठाम भूमिका घेतली.

गणेश मंडळांच्या काही कार्यकर्त्यांचे त्यांच्या भूमिकेशी मतभेद असल्याने, या विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला. परिणामी, डीजेबाबत सुरू असलेल्या या चर्चेत विद्यानंद बापट हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही