Sericulture | शेतकऱ्यांसाठी खुशखबर; रेशीम शेतीसाठी मिळतंय एकरी 4 लाखाचा अनुदान; वाचा कसे मिळवायचे अनुदान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sericulture | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान योजना राबवत असते.

अशात रेशीम शेती ( Sericulture ) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेशीम उत्पादन हा शेतीस  पूरक व्यवसाय मानला जातो.  शेतकरी कमी खर्चात आणि कमी साहित्याच्या मदतीने हा व्यवसाय करू शकतात.

त्याचबरोबर देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये रेशीम वस्त्रांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरवर्षी 16 ते 20 टक्क्यांने ही मागणी वाढत आहे. अशात सरकारने ही  ( Sericulture ) शेती करणाऱ्यांसाठी विशेष योजना आणली आहे.

रेशीम शेती  ( Sericulture ) करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत एक एकरच्या लागवडीसाठी चार लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक पाठिंबा मिळणार आहे.

This scheme is for smallholder farmers

रेशीम शेती  ( Sericulture ) करणाऱ्या शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत एक एकराच्या लागवडीसाठी चार लाखांचं अनुदान दिलं जाणार आहे.

या योजनेमध्ये  ( Sericulture ) शेतकऱ्यांना एक एकरच्या मर्यादेत पहिल्या वर्षी अकुशल मजुरी 01 लाख 26 हजार 720 रुपये मिळतात. त्याचबरोबर कुशलसाठी शेतकऱ्यांना 93 हजार 210 रुपयांचा लाभ मिळतो.

यासाठी शेतकऱ्यांना  ( Sericulture ) 20 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतील महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं जाईल. तर या योजनेतील लाभार्थी जॉब कार्डधारक असावा.

या योजनेचा  ( Sericulture ) लाभ मिळवण्यासाठी मनरेगा कृती आराखडा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी महसूल कृषी विभाग किंवा रेशीम कार्यालयाला भेट देऊ शकतात. या योजनेअंतर्गत  ( Sericulture ) अनुदानाची रक्कम ही तीन वर्षात वितरित केली जाते.

महत्वाच्या बातम्या