Uddhav Thackeray | पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारला खडे बोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | मुंबई: राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली आहे.

यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली.

यानंतर उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray ) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, असं उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं आहे.

What words to use for government? – Uddhav Thackeray 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात नव्हते.

दुसऱ्याच्या घरात धूनी-भांडी करायला जाणारी लोक, राज्यकारभार करायला नालायक आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयव विकायला काढले आहे.

शेतकऱ्यांमध्ये ही मानसिकता निर्माण झाली आहे. अशात सरकारसाठी कोणते शब्द वापरायचे? गेल्या काही दिवसापासून आमच्या पक्षाचे लोक शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे.

ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर संकट उद्भवलं आहे, त्या ठिकाणच्या कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेऊन जा, असं माझं माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे.”

पुढे बोलताना ते  ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या. नाहीतर नुकसान भरपाई द्या. माझ्या बळीराजाला न्याय द्या.

सरकारने विमा कंपन्यांच्या डोक्यावर आठ हजार रुपये घातले. एक रुपयाला सरकारने विमा दिला होता. तो विमा कुठे आहे? त्याचबरोबर तो कुणाला मिळाला आहे?

मतदान झाल्यानंतर राज्यातील गॅस सिलेंडरची किंमत पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्यामध्ये यापूर्वी एवढा खोटारडेपणा कधीच दिसून आला नव्हता. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.”

महत्वाच्या बातम्या