Rohit Sharma | रोहित शर्मा होणार टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार? IPL नंतर BCCI घेणार मोठा निर्णय

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 च्या उपांत्य फेरीमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटपासून दूर आहे.

अशात रोहित शर्मा  ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. कारण येत्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये बीसीसीआय रोहित शर्माला  ( Rohit Sharma ) संघाचा कर्णधार करणार असल्याचं बोललं जात आहे.

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर बीसीसीआय याबाबत निर्णय जाहीर करणार आहे.

The Indian team is going to tour South Africa

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा  ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली यांना एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. परंतु, यानंतर दोन्ही खेळाडू टी-20 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रोहित शर्माने  ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला तर पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यालाच भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात येईल.

यापूर्वी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) टीम इंडियाचा कर्णधार बनवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र रोहित शर्मा  ( Rohit Sharma ) जर टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळणार असेल तर हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनण्याची संधी मिळणार नाही.

दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयपीएल स्पर्धा होणार आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे.

तत्पूर्वी मुंबई इंडियन्स संघामध्ये मोठा बदल झाला आहे. हार्दिक पांड्या गुजरातला सोडून मुंबईत सामील झाला आहे. त्यानंतर रोहितच्या  ( Rohit Sharma ) जागी हार्दिकला संघाचा कर्णधार बनवलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.