Share

IPL 2024 | आयपीएल 2024 चं नियोजन भारताबाहेर होणार? मोठं कारण येतयं समोर

The IPL auction will be held on December 19, 2024 in Dubai

Published On: 

🕒 1 min read

IPL 2024 | टीम महाराष्ट्र देशा: क्रिकेट चाहते दरवर्षी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची आतुरतेने वाट बघत असतात. या स्पर्धेसाठी ( IPL 2023 ) सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. 19 डिसेंबर 2024 रोजी दुबई येथे आयपीएलचा लिलाव होणार आहे.

तत्पूर्वी मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएल 2024  ( IPL 2024 ) चं नियोजन भारताबाहेर केलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कारण देशामध्ये 2024 मध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल  ( IPL 2024 ) भारताबाहेर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

IPL 2024 will be planned outside India?

भारतामध्ये 2024 मध्ये निवडणूका होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या तारखा देखील समोर येऊ शकल्या नाही.

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आयपीएलच्या  ( IPL 2024 ) तारखा समोर येतील, अशा चर्चा सुरू आहे. परंतु, तत्पूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएल ( IPL 2024 ) भारताबाहेर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. कारण यापूर्वी देखील निवडणुकांमुळे आयपीएल स्पर्धेचं आयोजन भारताबाहेर करण्यात आलं होतं.

2009 मध्ये निवडणुकांमुळे दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा झाली होती. तर 2014 मध्ये देखील निवडणुकांमुळे या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने युएईमध्ये झाले होते. अशात यंदा देखील ही स्पर्धा  ( IPL 2024 ) भारताबाहेर होणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आयपीएल 2024  ( IPL 2024 ) च्या  लिलावापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians )  मोठा बदल झाला आहे. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) पुन्हा एकदा मुंबईमध्ये सामील झाला आहे.

त्याची मुंबईमध्ये एन्ट्री होताच त्याला संघाचा कर्णधार करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चर्चांवर आर अश्विन  ( R Ashwin )  याने प्रतिक्रिया दिली आहे.

“रोहित शर्मा ( Rohit Sharma ) अत्यंत मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यासह तो एक उत्तम लीडर देखील आहे. मुंबई इंडियन्सने संघाचं कर्णधार पद हार्दिक पांड्याला दिलं तर रोहित शर्मा ही परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळेल”, असं अश्विनने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!