Share

IND vs AUS | श्रेयसच्या एन्ट्रीनंतर रोहितचा खास धुरंधर संघाच्या बाहेर? पाहा प्लेइंग-11

The fourth match of the ongoing T20 series between India and Australia (IND vs AUS) will be played today

Published On: 

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav ) नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे.

टीम इंडियाने या मालिकेतील ( IND vs AUS ) दोन सामने जिंकले आहे, तर ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील तिसरा सामना आपल्या नावावर केला आहे.

अशात शुक्रवारी या मालिकेतील ( IND vs AUS )  चौथा सामना रायपूरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघात बदल झालेला दिसणार आहे.

कारण भारतीय संघामध्ये एका खेळाडूची एन्ट्री होणार आहे. तर त्याच्या एंट्रीनंतर एक खेळाडू संघाच्या बाहेर जाणार आहे.

Shreyas Iyer will be the vice-captain of the team

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) यांच्यामध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील आज चौथा सामना खेळला जाणार आहे.

या सामन्यात ( IND vs AUS ) टीम इंडियात श्रेयस अय्यरची ( Shreyas Iyer ) एन्ट्री होणार आहे. पुढच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघाचं उपकर्णधार पद सांभाळणार आहे.

अशात श्रेयस अय्यरचा संघात समावेश झाल्यानंतर सूर्यकुमार यादव कोणाला मैदाना बाहेर बसवणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सूर्यकुमार यादव तिलक वर्माला ( Tilak Verma ) बाहेर बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या तीन सामन्यांमध्ये ( IND vs AUS ) त्याने एकही मोठी खेळी खेळलेली नाही.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ( IND vs AUS ) होणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघांमध्ये ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंचा समावेश असू शकतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही