Weather Update | शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; राज्यात येत्या 24 तासात पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये थंडीच्या दिवसात पाऊस धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

तर काही भागांना गारपिटीने झोडपून काढलं आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतीसह फळबागांचं नुकसान झालं आहे. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

अशात हवामान विभागाने ( Weather Update ) शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडणारी माहिती दिली आहे. येत्या 24 तासात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे.

Chance of rain in most parts of the state

आज (01 डिसेंबर) देशासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये गारपिटीसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या भागांमध्ये विजांसह पाऊस पडेल, असं हवामान खात्याने  ( Weather Update )  म्हटलं आहे.

त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावं, असं देखील हवामान खात्याकडून  ( Weather Update ) सांगण्यात आलं आहे.

Dates Benefits

दरम्यान, राज्यात एकीकडे पाऊस धुमाकूळ घालत आहे, तर दुसरीकडे थंडी वाढत चालली आहे. अशात या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा समावेश करू शकतात. खजुराचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो, गुडघेदुखी दूर होते, त्याचबरोबर पचनक्रिया चांगली राहते.

महत्वाच्या बातम्या