Share

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेतील 15 वा हप्ता मिळाला नाही? तर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून करा तक्रार

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेतील पंधरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला आहे. पीएम मोदींनी ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना पाठवली आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेतील ( PM Kisan Yojana ) हा हप्ता मिळालेला नाही. अशात तुम्हाला देखील या … Read more

Published On: 

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेतील पंधरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला आहे.

पीएम मोदींनी ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना पाठवली आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेतील ( PM Kisan Yojana ) हा हप्ता मिळालेला नाही.

अशात तुम्हाला देखील या योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही खालील हेल्पलाइन क्रमांकावर त्यासंबंधी तक्रार नोंदवू शकतात.

Farmers can contact the helpline number of PM Kisan Yojana

प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेतील ( PM Kisan Yojana ) पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या या प्रक्रिया पूर्ण नसतील त्यांना या योजनेतील ( PM Kisan Yojana ) पंधरावा हप्ता मिळालेला नाही.

मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या या प्रक्रिया पूर्ण आहे आणि त्यांना या योजनेतील हप्ता मिळाला नसेल तर ते प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या ( PM Kisan Yojana ) हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून त्यांची समस्या नोंदवू शकतात.

आपली तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. त्याचबरोबर शेतकरी त्यांची समस्या pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीद्वारे देखील नोंदवू शकतात.

दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यक करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान योजना ( PM Kisan Yojana ) सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत ( PM Kisan Yojana ) केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते.

दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ही मदत पाठवली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेतील 15 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. शेतकरी या योजनेतील 16 व्या हप्त्याची वाट बघत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही