Manoj Jarange | छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर गेले तर शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल – मनोज जरांगे

Manoj Jarange | छत्रपती संभाजीनगर: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी धडपड करत आहे.

अशात मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली दिसली.

यानंतर दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसले. अशात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर गेले तर शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल, असं मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

We don’t want to talk about that man – Manoj Jarange

मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) म्हणाले, “जो व्यक्ती शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण देऊ नका म्हणत असतो, त्याचबरोबर जो व्यक्ती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अशा माणसाबद्दल काय बोलायचं.

त्या माणसाने शेतकऱ्यांच्या बांधावर जायला नाही पाहिजे. तो माणूस शेतकऱ्यांच्या बांधावर गेला तर शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. तो माणूस म्हणजे पनौती आहे.

त्यामुळे त्या माणसाबद्दल बोलणं आम्हाला नको वाटतं. मंत्री गेल्यावर शेतकऱ्यांचं चांगलं होतं असं काही नाही. शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी प्रशासन आहे.

प्रशासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तयार करत आहे. शेतकऱ्यांना वाचवा, शेतकऱ्यांना मरू देऊ नका, अशी माझी सरकारला विनंती आहे.”

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे.

त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाने त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.