Share

Narayan Rane | कोण तो, त्याला काय कळतं; नारायण राणेंची मनोज जरांगेंवर खालच्या स्तराची टीका

Narayan Rane | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्यामध्ये मोठं आंदोलन सुरू केलं आहे.

राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद सुरू झाला आहे. हे वादविवाद सुरू असताना भाजप नेते नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी मनोज जरांगे यांच्यावर खालच्या स्तराला जाऊन टीका केली आहे.

कोण तो, त्याला काय कळतं, असं म्हणत नारायण राणे ( Narayan Rane )  यांनी जरांगेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्या या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Who is Manoj Jarange? – Narayan Rane

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना नारायण राणे ( Narayan Rane ) म्हणाले, “कोण आहे हा मनोज जरांगे? मी ( Narayan Rane ) ओळखत नाही त्याला.

कशाला तुम्ही त्याचं नाव घेता. काय त्याचा जातीबद्दल अभ्यास आहे? मराठा समाजाला कोणत्या घटनेच्या कलमाने आरक्षण द्यावं? एकदा त्यांनी ते विचारून यायला हवं.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसींनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. गो बॅक छगन भुजबळ, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Narayan Rane has criticized Manoj Jarange at a low level

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now