Share

Sanjay Raut | शेतकरी संकटात असताना राज्याचा सुलतान आणि उपसुलतान निवडणुकांच्या प्रचारात मग्न – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: देशातील काही राज्यामध्ये निवडणुकांची चाहूल लागली आहे. या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी राज्यातील बहुतांश नेते त्या ठिकाणी दाखल झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) या प्रचाराला जाताना दिसले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

शेतकरी संकटात असताना राज्याचा सुलतान आणि उपसुलतान निवडणुकांच्या प्रचारात मग्न आहे, असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

Unseasonal rain lashed the state

राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यामध्ये निवडणुकांचं सत्र सुरू आहे.

अशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले दिसून आले आहे. यावरून संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Where is the government? – Sanjay Raut 

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यातील शेतकरी बांधावर बसून रडत आहे.

नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यात आत्महत्याचे विचार येत आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण इत्यादी भागांमध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात असताना सरकार कुठे आहे? सरकार जागेवर आहे का? सरकार पसार झालं आहे.”

पुढे बोलताना ते ( Sanjay Raut ) म्हणाले, “राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आलेलं असताना शेतकरी संकटात असताना राज्याचा सुलतान आणि दोन उपसुलतान निवडणुकांच्या प्रचारात मग्न आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं निवडणूक पर्यटन सुरू आहे. आम्ही प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले आहे.

महत्वाच्या बातम्या

Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar went to election campaign

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now