Dates Benefits | हिवाळ्यामध्ये खजुराचे सेवन करणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dates Benefits | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. गुलाबी थंडीच्या दिवसात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशात या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं.

त्याचबरोबर या हवामानात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणं देखील अत्यंत गरजेचं असतं. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा ( Dates Benefits ) समावेश करू शकतात.

खजुराचे सेवन  ( Dates Benefits ) केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर खजुरामध्ये आढळणारे कॅल्शियम, खनिजे, आयरन, फॉस्फरस इत्यादी पोषक घटक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. बदलत्या हवामानात नियमित खजुराचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

सर्दी-खोकल्यापासून आराम  ( Relief from cold and cough-Dates Benefits ) 

बदलत्या वातावरणात अनेकांना सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी दोन ते तीन खजूर दुधात मिसळून त्याचे सेवन करू शकतात. नियमित याचे सेवन केल्याने तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

पचनक्रिया चांगली राहते   ( Digestion remains good-Dates Benefits ) 

तुम्हाला जर पचनाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर खजूर तुमच्यासाठी रामबाण इलाज ठरू शकतात.

नियमित खजुराचे सेवन केल्याने तुम्ही गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्टता, अपचन इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात. कारण खजुरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे या समस्या दूर करण्यास मदत करते.

गुडघेदुखी पासून आराम   ( Relief from knee pain-Dates Benefits ) 

हिवाळ्यामध्ये गुडघेदुखी, सांधेदुखी इत्यादी समस्या वाढतात. अशात नियमित खजुराचे सेवन केल्याने तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकतात.

खजूरामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, सेलेनियम, मॅगनीज इ. पोषक तत्व आढळून येतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Chance of rain in the state for the next 48 hours

दरम्यान, राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. अशात पुढील 48 तास राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे पहाटेच्या वेळी थंडी वाढत चालली आहे. अशात या बदलत्या  वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजुराचा समावेश करू शकतात.

महत्वाच्या बातम्या