🕒 1 min read
IMD Alert | देशात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून भारतीय हवामान विभागाने एकूण १७ राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र तापमानात झपाट्याने वाढ होत असून उष्णतेची लाट जाणवत आहे.
IMD Alert: Heavy Rainfall Expected Across 17 Indian States
उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि जोरदार पावसाचा अंदाज
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातही पावसाची शक्यता
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीमध्ये मात्र पावसाची शक्यता नसली तरी आकाश ढगाळ राहील.
पूर्व भारतातही पाऊस बहरणार
पूर्व भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः २२ एप्रिल रोजी काही भागांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतही नाही राहणार वाचून
कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट; चंद्रपूरमध्ये ४५.६ अंश तापमान
महाराष्ट्रात मात्र पावसाऐवजी तापमानात मोठी वाढ होत आहे. ( No Rain but Heatwave in Maharashtra, Says IMD Alert ) अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचे पालन करावे- जिल्हाधिकारी
- अभिनेत्री Rajeshwari Kharat ने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; टीका करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना झाप झापलं
- विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत खोटे आरोप; निवडणूक आयोगाने फेटाळले Ranjeet Kasle यांचे दावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now