Share

भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान

विधानसभेत दूध व अन्न भेसळीचा मुद्दा गाजला आहे. दोषींना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आणि कारवाईनंतर राज्यातील दूध उत्पादन २५% घटल्याचा मोठा खुलासा सरकारने केला.

Published On: 

Narhari Jhirwal

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या दूध आणि अन्नपदार्थांमधील वाढत्या भेसळीच्या (Food Adulteration) घटनांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी गंभीर (Health) खेळ सुरू असल्याचा मुद्दा आज विधानसभेत प्रचंड गाजला. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही यावर आक्रमक पवित्रा घेतला. आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी भेसळखोरांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी करत, अशा गुन्हेगारांना थेट जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे, असा थेट सवाल विचारला. त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवळ (Narhari Jhirwal) यांनी सभागृहात एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली.

कायद्यातच मृत्युदंडाची शिक्षा  

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) खात्याचा कारभार आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांनी हाती घेतल्यापासून राज्यात भेसळखोरांवर दणादण कारवाया सुरू आहेत. अवघ्या ५ रुपयांत तयार होणारे केमिकल आणि रसायुक्त दूध बाजारात ७० ते ९० रुपये प्रतिलिटरने विकले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते पार विदर्भापर्यंत अनेक दूध डेअऱ्यांवर टाकलेल्या धाडींमधून हे भयावह सत्य उघड झाले आहे. यावर सभागृहात सदस्यांनी थेट फाशीची मागणी केली असता, मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले की, विद्यमान कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्यांना १ लाख रुपयांच्या दंडापासून ते थेट मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची स्पष्ट तरतूद आधीच अस्तित्वात आहे.

गोपीचंद पडळकर संतप्त

दरम्यान, सत्ताधारी बाकांवरील अनेक सदस्यांनी या दूध भेसळीच्या (Milk Adulteration) रॅकेटवर तीव्र संताप व्यक्त केला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक होत मागणी केली की, कोणत्याही दूध संघावर कारवाई करण्यापूर्वी तिथे नेमके किती दूध येत होते आणि किती दूध बाहेर जात होते, याची कसून तपासणी झाली पाहिजे. राज्यातील दुधाच्या गुणवत्तेत नेमकी किती घट झाली आहे? दुधात भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या काळ्या व्यवसायात समाजातील अनेक पांढरपेशी आणि प्रतिष्ठित लोक सामील असून, त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी पडळकरांनी केली.

कारवाई होताच राज्यातील दूध उत्पादनात २५ टक्के घट!

आमदार पडळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी सभागृहासमोर ठेवली. राज्यात कडक कारवाई सुरू होताच भेसळयुक्त दुधाचे प्रमाण थांबले असून, त्यामुळे राज्यातील एकूण अधिकृत दूध उत्पादनात तब्बल २५ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावर पडळकरांनी पुन्हा सरकारला घेरले की, जर उत्पादनात एवढी मोठी घट दिसत असेल, तर संबंधित दूध संघांवर गुन्हे कधी दाखल होणार आणि ठोस कारवाई कधी होणार? त्यावर, भेसळ करणाऱ्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री झिरवळ यांनी दिले.

आमदाराच्या जेवणात आढळली माशी

याच चर्चेदरम्यान आमदार किशोर पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची वारंवार बदली केली जाते, पण आता ते अन्न आणि औषध प्रशासन खात्यात उत्कृष्ट काम करत असल्याने त्यांना किमान तीन वर्षे याच खात्यात ठेवण्यात यावे, जेणेकरून भेसळमुक्त महाराष्ट्र करता येईल, अशी मागणी त्यांनी केली. तर दुसरीकडे, हॉटेल आणि कँटीनमधील अन्नाच्या दर्जावर बोलताना आमदार विकास ठाकरे यांनी धक्कादायक माहिती दिली की, त्यांच्या पक्ष कार्यालयात जेवण करत असताना आमदार अमित झनक यांच्या जेवणात थेट माशी आढळली होती. या संपूर्ण विषयावर सुधीर मुनगंटीवार यांनीही आक्रमक भूमिका घेत, यावर विशेष कॅबिनेट बैठक बोलावण्याची मागणी केली. आपण यापूर्वीच हा मुद्दा मांडला होता, मात्र त्यावर पुरेशी कारवाई झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही