🕒 1 min read
पुणे – ‘फॅण्ड्री’ चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाण्यात हात जोडलेला फोटो शेअर केला असून त्याला “Baptised” असा कॅप्शन दिला आहे. या फोटोवर काही युजर्सनी राजेश्वरीच्या धर्मासंदर्भात प्रश्न उपस्थित करत टीकास्त्र सोडलं.
एका युजरने लिहिलं की, “ख्रिश्चन धर्मापेक्षा प्राचीन आणि सुंदर असा बुद्धाचा धम्म असताना दुसऱ्या धर्माची गरजच काय? बाबासाहेबांनी तब्बल २५ वर्ष अभ्यास करून भारतीय मूळ असलेला धम्म दिला.” तर दुसऱ्याने “काळी चिमणी घालवली… अनफॉलो…” अशा प्रकारच्या टीका केल्या.
या टीकांना अभिनेत्री राजेश्वरी खरातने स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलं आहे. इंस्टा स्टोरीवर तिने लिहिलं
“निवडणुकीत 500 रुपयात मत विकणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये. माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातच झाला असून मी सर्व धर्मांचा आदर करते.”
तिने पुढे लिहिलं,
“निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू, हॉटेलमधील जेवण, साहेब, दैवत, देव माणूस… हे सगळं घेणारे लोक आता मला धर्म शिकवत आहेत. त्यांचे स्वागत आहे!”
राजेश्वरीच्या या उत्तरामुळे अनेकांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे, तर काहीजण अजूनही तिला ट्रोल करत आहेत. मात्र, तिने आपली भूमिका ठामपणे मांडत धर्माच्या ठेकेदारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Rajeshwari Kharat Social Media Post On “Baptised”
निवडणुका,
प्रत्येकी 500 रुपये,
किराणा भरून पिशव्या,
दारू व हॉटेलला जेवण,
आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे…
हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे.
कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात.
माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे.
टीप :- माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे, आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती. 😊🙏🏻
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत खोटे आरोप; निवडणूक आयोगाने फेटाळले Ranjeet Kasle यांचे दावे
- IPL 2025 : रोहित शर्माचा फॉर्म आणि मुंबई इंडियन्ससाठी नवीन चॅलेंज!
- MI vs SRH | मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now