Share

विक्रम काकडेंनी भरला फॉर्म, पुण्यात भाजपच्या बंडखोरीने वाढला सस्पेन्स

पुणे विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाकडून विक्रम काकडे तर भाजपमधून प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज भरल्याने महायुतीत मोठे नाराजीनाट्य रंगले आहे.

Published On: 

vidhan parishad 2026

पुणे – एकाच पक्षातून दोघांनी अर्ज भरावा आणि मित्रपक्षाच्या नेत्याने थेट बंडखोरीचे निशाण फडकावावे, असा राजकीय थरार कधी पुण्यात पाहिलाय का? पुणे विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी हाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला असून यामुळे जिल्ह्यात ‘खळबळ उडाली’ आहे.

महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदरात पडली आहे. नुकतेच भाजपमधून घड्याळ हाती घेतलेले विक्रम काकडे यांनी पक्षाकडून अधिकृत अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे पक्षाचेच नेते सुनील टिंगरे यांनी पक्ष कार्यालयात बसूनच डमी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

Pune Vidhanparishad Election 2026

ट्विस्ट एवढ्यावरच संपत नाही, कारण महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे प्रदीप कंद यांनी थेट अपक्ष अर्ज दाखल केला आहे. प्रदीप कंद यांच्या या पावलामुळे पुण्यात महायुतीमधील ‘राजकारण तापलं’ असून ही अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आता दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर उभे राहिले आहे.

महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली वेगाने घडल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आधीच अर्ज दाखल केला असून, त्यांच्यासाठी तुषार कामटे यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. दोन्ही बाजूने डमी अर्जांचे राजकारण सुरू झाल्याने सस्पेन्स वाढला आहे.

या संपूर्ण नाराजीनाट्यावर आणि गोंधळाच्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी पुण्यात भाष्य केले. वरिष्ठांनी जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला पूर्णपणे मान्य असून कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण उमेदवाराच्या पाठीशी ताकदीने उभे राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जे कोणी लोक सध्या नाराज आहेत, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही योग्य चर्चा करू आणि त्यांची नाराजी नक्कीच दूर करू, असा विश्वास जय पवार यांनी व्यक्त केला. ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध व्हावी अशीच आमची आणि महायुतीमधील सर्व नेत्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विक्रम काकडे हेच आमचे अधिकृत उमेदवार असतील. एकत्रित चर्चा करूनच विक्रम काकडे यांचे नाव निश्चित झाले असून, काकडेंचा अर्ज वैध ठरताच सुनील टिंगरे आपला डमी अर्ज मागे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वादात भाजपचे नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही उडी घेतली असून महायुती म्हणून आम्ही एकत्र लढत असल्याचे सांगितले. संजय काकडे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असला, तरी महायुतीचा धर्म पाळून आम्ही त्यांच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावू, अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install