Radhakrishna Vikhe Patil । ओबीसी भूमिका मांडायची तर छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा – राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil । राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. त्यांचा ओबीसीत समावेश करू नका, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे. यासाठी छगन भुजबळ राज्यामध्ये जागोजागी मेळावे घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या राज्यात सभा होत आहे.

आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही, असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )  म्हणाले, “मराठवाड्यातील कुणबींना कुणबी असून प्रमाणपत्र मिळत नाही. मराठवाड्यातील या नोंदी सापडण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती.

त्याचबरोबर हा मूळ मुद्दा होता. त्यासाठी आमचा विरोध नव्हता. परंतु, त्यानंतर जे काही सुरू झालं त्याला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधा, असं आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. शिंदे समितीचं काम आता संपलेलं आहे. त्यामुळे ती समिती आता बरखास्त करा. मराठवाड्यातील काम आता संपलेलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil vs Chhagan Bhujbal

यावर आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, ओबीसीबाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे.

तसेच सध्या समाजात ओबीसी – मराठा असा निर्थक वाद सुरू आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. लोक त्यांच्याविषयी आदराने बोलतात. मात्र भूमिका मांडण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन ती मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकार मराठ्यांना फसवत आहे का? – मनोज जरांगे ( Manoj Jarange ) 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकार मागे घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी यापूर्वी सांगितले होते. परंतु आतापर्यत मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घेतले नाहीत. यावर जरांगे म्हणाले कि,  राज्य सरकार मराठ्यांना फसवत आहे का? ते मराठ्यांना वेड्यात काढत आहे का? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.  तसेच आम्ही उघड्याला उघड पाडणार आहोत, असेही मनोज जरांगे म्हणाले. 

दरम्यान, राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते ( Manoj Jarange ) म्हणाले, “सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, ही माझी शासनाला हात जोडून विनंती आहे. पेरणी करत असताना व्यवस्थित पाऊस झाला नाही. पेरणी झाल्यानंतर देखील पुरेसा पाऊस पडला नाही.

त्यानंतर आता अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना मदत करायला हवी.”

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.