Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडने ५२ चेंडूत आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिले शतक झळकावले. यात 13 चौकार 7 षटकारांचा समावेश होता. २० व्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार मारून ऋतुराजने शतक पूर्ण केले. शतकानंतर ऋतुराजने ( Ruturaj Gaikwad ) ग्लेन मॅक्सवेलच्या अखेरच्या षटकात ३ षटकार आणि २ चौकारांसह २० धावा ठोकल्या.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज नववा फलंदाज ठरला. रोहित शर्मा ( ४ शतक ), सूर्यकुमार यादव ( ३ शतक ) व लोकेश राहुल ( २ शतक ) यांनी शतक केले आहेत. सुरेश रैना, विराट कोहली, दीपक हुडा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल व ऋतुराज यांच्या नावावर एक शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज ( Ruturaj Gaikwad ) पहिला भारतीय ठरला आहे.
ऋतुराजला तिलक वर्माने २४ चेंडूत नाबाद ३१ धावा करत चांगली साथ दिली. ऋतुराज गायकवाडने पहिल्या २१ चेंडूंत २१ धावा केल्या होत्या, त्यानंतर पुढील ३४ चेंडूंत त्याने १०१ धावा कुटल्या. शेवटच्या ३ षटकांत ऋतुराजने ( Ruturaj Gaikwad )५२ धावा ठोकल्या.
भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२३ धावांचे लक्ष्य दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
3rd IND vs AUS T20 | मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग : कधी आणि कुठे पहायचे
Airtel VS Jio भांडणात लोकांचा फायदा; मोफत Netflix आणि 3GB डेटासह नवीन मोबाइल प्लॅन लॉन्च
Raj Thackeray | हिंदुत्वाबद्दल शिंदे सरकार फक्त तोंड वाजवतंय – राज ठाकरे
Eknath Shinde | मराठा आरक्षणाबाबत जी छगन भुजबळांची भूमिका, तीच सरकारची भूमिका