Eknath Shinde | मराठा आरक्षणाबाबत जी छगन भुजबळांची भूमिका, तीच सरकारची भूमिका – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. त्यांचा ओबीसीत समावेश करू नका, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे.

यासाठी छगन भुजबळ राज्यामध्ये जागोजागी मेळावे घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या राज्यात सभा होत आहे.

अशात या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. या घटनेनंतर मराठा समाज आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

We have made our position clear – Eknath Shinde

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, “जिथे कुणबी नोंदी असताना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळाले नव्हते, तिथे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

1967 ते 2004 पासून याच जीआरचा अवलंब केला जात आहे. कुणब्यांच्या जुन्या नोंदणीबाबत आपण जीआर काढलेला नाही.

मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये, असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. सरकारची देखील तीच भूमिका आहे. आम्ही ( Eknath Shinde ) आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.”

दरम्यान, मराठा समाजाने केलेल्या मागणीवरून मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आहे. या प्रकरणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले.

अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी छगन भुजबळ यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर दोन्ही समाजामध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.